मोठी बातमी; मुंबईत भायखळ्यातील इमारतीला भीषण आग

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

मुंबईच्या भायखळ्यातील म्हाडा कॉलनीच्या एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला आग लागल्याची घटना घडली आहे. ही म्हाडा कॉलोनीतील २४ माजली इमारत आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर ५ अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या असून, १३५ जणांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे.

मुंबईच्या भायखळ्यातील २४ माजली इमारतीला आग लागल्यानंतर या घटनेत कुठलीही जीवितहानी झालेली नाही, अशी माहिती अग्निशमन दलाने दिली आहे. मात्र, या आगीच्या घुरामुळे ९ जणांना श्वास घेतांस अडचण निर्माण झाल्याची माहिती समोर येत आहे. या ९ जणांना केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आहे.

लक्ष्मी राऊत (७०), अर्चना मोरे (७५), प्रणय तांबोळे (२८), अर्चना निलेश मोरे, मुमताज (६०), पार्वतीबाई तांबोळे (८५), अभिष (३६), विशाल विजय मोरे (३४) आणि लता तांबोळे (६७) अशी श्वास गुदमरलेल्या रुग्णांची नावे आहेत. या रुग्णांवर तज्ज्ञ डॉक्टर लक्ष ठेऊन आहेत. त्यांच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

आग लागली कशी?

भायखळ्याच्या म्हाडा कॉलोनीच्या २४ इमारतीमधील तिसऱ्या मजल्याला आग लागली. आग लागताच या घटनेची माहिती नागरिकांनी अग्नीशमन दलाला दिली. त्यानंतर ५ अग्नीबंब घटनास्थळी झखल झाले. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याबर इलेक्ट्रिक मीटर केबिन तसेच इलेक्ट्रीक डक्ट आणि गार्बेज डक्टला आग लागली होती. इमारतीच्या तिसऱ्या मजल्याला आग कशी लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.