भारतीय रेल्वेची तिकिट बुकिंग IRCTC ची साइट अनिश्चित काळासाठी बंद

0

नवी दिल्ली ;- भारतीय रेल्वेची तिकिट बुकिंग साईट IRCTC ठप्प पडली असून हिची सेवा अनिश्चित काळासाठी बंद झाली आहे. काही तांत्रिक कारणांमुळं तिकिट बुक करण्यात समस्या येत आहे, असं आयआरसीटीसीने ट्विट करत म्हटलं आहे. तांत्रिक अडचण दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत असून लवकरच तांत्रिक बिघाड दुरुस्त केला जाईल. त्यानंतर सेवा पुन्हा एकदा प्रवाशांसाठी सुरू होणार आहे, असं कंपनीच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.
https://twitter.com/IRCTCofficial
आयआरसीटी वेबसाइट सतत ठप्प होत असल्याने प्रवाशांमध्ये संताप पाहायला मिळत आहे. अनेकांनी ट्विटरवरुन तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे. प्रवाशांना तिकिट बुक करण्यास अडचणी येत आहेत. तर, आयआरसीटीसीकडून लवकरच वेबसाइट सुरु करण्यात येईल, असं सांगण्यात येत आहे. तांत्रिक कारण शोधण्याचे काम टीम कडून करण्यात येत आहे, असं सांगण्यात येत आहे.

आयआरसीटीसीची वेबसाइट पुन्हा कधी पुर्ववत होईल हे मात्र अद्याप सांगण्यात आले नाहीये. देशातील अनेक भागातील लोकांना ही समस्या येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.