राऊतांनंतर आता ठाकरेंचा नंबर; निलेश राणेंचं सूचक वक्तव्य

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काल शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरी ईडीने (Ed) छापेमारी केल्यानंतर तब्बल ९ तास चौकशी केल्यानंतर त्यांना ताब्यात घेतले आहे. संजय राऊत यांना पत्रा चाळ घोटाळा (Patra Chawl Case) प्रकरणात ही कारवाई करण्यात आली आहे. जवळपास 1000 कोटी पेक्षा जास्तीचा हा घोटाळा असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी विरोधकांच्या गोटातून प्रतिक्रिया येत आहेत.

आता याप्रकरणी भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी भाष्य केलं आहे. त्यांनी एक ट्वीट करत खासदार राऊतांवर निशाणा साधला आहे.  काल राऊत घरातून बाहेर पडतानाचा त्यांच्या त्यांचे कुटुंबीय अत्यंत भावूक झाल्याचा व्हिडीओ समोर आला होता. संजय राऊत यांच्या मातोश्रींनी त्यांचं औक्षण केलं आणि राऊतांनीही आईच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांचा आशीर्वाद घेतला, त्यावरुन भाजपचे निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे.

निलेश राणे यांनी ट्वीट करत म्हणाले की, दुसऱ्यांच्या घरात पण आई असते, मागच्या अडीच वर्षात दुसऱ्यांच्या आईंना किती त्रास दिला ठाकरे सरकारने हे संजय राऊत विसरता कामा नये. हेच उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि कुटुंबाला पण लागू होतं, कारण पुढचा नंबर त्यांचा असू शकतो, असं सूचक वक्तव्य त्यांनी केलं आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.