नायब तहसीलदारसह लिपिकास अटक; काय आहे प्रकरण ?

0

भुसावळ, लोकशाही न्यूज नेटवर्क 

भुसावळ (Bhusawal) येथील संजय गांधी निराधार योजनेचे नायब तहसीलदार (Deputy Tehsildar of Sanjay Gandhi Niradhar Yojana) शशिकांत इंगळे यांच्यासह लिपीक (Clerk) श्याम तिवारी या दोघांना बनावट आदेशाने प्लॉट विक्री केल्याप्रकरणी अटक केली आहे.  भुसावळ शहर पोलिसांनी (Bhusawal City Police) केलेल्या अटकेच्या या कारवाईमुळे महसुल प्रशासनात खळबळ उडाली आहे. तसेच चार सर्कल व १७ तलाठ्यांची चौकशी करण्यात येणार आहे.

तहसीलदारांचे बनावट आदेश वापरून शहरातील जनकल्याण पतसंस्थेचा विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे याने संस्थेचे प्लॉट विकल्याचे प्रकरणात अधिकार्‍यांचा समावेश असल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणी भुसावळ पोलिसांनी काल सायंकाळी नायब तहसीलदार शशिकांत इंगळे आणि लिपिक शाम तिवारी यांना अटक केल्याने खळबळ उडाली आहे. तसेच याच प्रकरणात पोलिस ४ मंडळ अधिकारी आणि सुमारे १७ तलाठ्यांची चौकशी करून जबाब नोंदवणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे.

विशेष वसुली अधिकारी रवींद्र धांडे यांनी तहसीलदारांचे बनावट आदेशपत्र तयार करून जनकल्याण अर्बन पतसंस्थेचे प्लॉट १० जणांना विक्री केले. याप्रकरणी धांडेसह प्लॉट खरेदी करणारे मिळून ११ जणांवर गुन्हे दाखल आहेत. पतसंस्थेचे विशेष वसुली अधिकारी धांडे यांना तहसीलदारांकडून प्लॉट विक्रीचे परवानगी पत्र हवे होते. त्यासाठी धांडेंनी भूषण बेंडाळे या दलालाच्या माध्यमातून नायब तहसीलदार इंगळे यांची भेट घेतली. यानंतर इंगळेंनी संबंधित आदेश करण्याच्या सूचना लिपिक शाम तिवारी यांना दिल्या. त्यानुसार तिवारीने पत्र काढल्याची माहिती समोर आल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.