दिलासादायक ! व्यावसायिक LPG सिलेंडर झाले स्वस्त; पहा नवीन किंमत

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

वाढत्या महागाईत (inflation) एक दिलासादायक बातमी आहे. महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक LPG सिलिंडरच्या (19 किलो) किमती आज कमी झाल्यामुळे LPG सिलेंडर वापरणाऱ्या ग्राहकांना दिलासा मिळाला आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने (Indian Oil Corporation) व्यावसायिक एलपीजी सिलिंडरच्या किमतीत कपात (LPG Price Reduced) केली आहे. यानंतर दिल्लीत एलपीजी सिलिंडरची किंमत 36 रुपयांनी स्वस्त झाली आहे.

नवीन किमती 

मुंबईत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांनी कपात केल्यानंतर आता 1936.50 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे, जो पूर्वी 1972.50 रुपये प्रति सिलेंडर होता

दिल्लीत एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36 रुपयांची कपात केल्यानंतर ती 1976.50 रुपये प्रति सिलेंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2012.50 रुपये होती.

कोलकातामध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर ती 2095.50 रुपये प्रति सिलिंडर झाली आहे. यापूर्वी त्याची किंमत प्रति सिलेंडर 2132 रुपये होती.

चेन्नईमध्ये एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 36.50 रुपयांची कपात केल्यानंतर 2141 रुपये प्रति सिलेंडर झाला आहे. यापूर्वी त्याची किंमत 2177.50 रुपये प्रति सिलेंडर होती.

यांना होणार फायदा

इंडियन ऑइल कॉर्पोरेशन म्हणजेच IOC च्या वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत 36 रुपयांपर्यंत कपात करण्यात आली आहे. रेस्टॉरंट, हॉटेल्स, ढाबा आणि इतर व्यावसायिक वापरकर्त्यांना 19 किलोचा सिलेंडर 36 रुपयांनी स्वस्त होण्याचा मुख्य फायदा मिळणार आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.