पेट्रोल-डिझेल पुन्हा महागणार ?; वाचा कारण..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

देशासह  राज्यात पेट्रोल डिझेलच्या किंमती स्थिर आहेत. त्यामुळे वाढत्या महागाईत (inflation) लोकांना दिलासा मिळाला आहे. 21 मे रोजी केंद्र सरकारने (Central government) पेट्रोल-डिझेलवरील उत्पादन शुल्क (Excise Duty) कमी केले होते. त्यामुळे इंधनाचे दर घसरले होते.

मात्र आता देशात पुन्हा एकदा पेट्रोलच्या किमती वाढण्याची शक्यता आहे.  इंडियन ऑईल कॉर्पोरेशनला (Indian Oil Corporation) पेट्रोल-डिझेल विक्रीत तोटा सहन करावा लागला आहे. गेल्या दोन वर्षांत कंपनीने पहिल्यांदाच तोट्याची (Loss) नोंद केली आहे. हा तोटा भरून काढण्यासाठी कंपन्या येत्या काही दिवसात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढवू शकतात.

IOC, BPCL आणि HPCL या सरकारी मालकीच्या तेल कंपन्यांनी गेल्या वर्षी दिवाळीनंतर इंधन दरात कुठलाही बदल केला नव्हता. तोटा होत असताना ही या कंपन्यांनी दरवाढ रोखून धरली होती. आता तोटा भरुन काढण्यासाठी कंपन्या थेट पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीत वाढ करू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांना पुन्हा एकदा महागाईची (Inflation) झळ लागण्याची दाट शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.