आ. चंद्रकांत पाटलांना जिल्हाप्रमुखपदावरून हटवले

0

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शिवसेनेमधून (Shivsena) बंडखोरी करत शिंदे गटात (Shinde Group) गेलेल्या अनेकांना शिवसेनेच्या पदावरून हटवले जात आहे. आता मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांना  शिवसेना जिल्हाप्रमुख (Shiv Sena District Chief) पदावरून काढण्यात आले आहे. त्यांच्या जागी माजी जि.प. सदस्य दीपकसिंग राजपूत (Former G.P. Member Deepak Singh Rajput) यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी शिंदे गटाला पाठींबा दिला. यामुळे जळगाव जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पदाधिकारी देखील शिंदे गटात दाखल झाले आहेत. या पार्श्‍वभूमिवर, अद्याप पर्यंत जळगाव जिल्ह्यातील पदाधिकार्‍यांना बदलण्यात आले नव्हते. आता मात्र जिल्हातील पदाधिकारी बदलण्यात येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

शिवसेना जिल्हाप्रमुखपदाची जबाबदारी आधी मुक्ताईनगरचे आमदार चंद्रकांत पाटील यांच्याकडे होती. आता ही धुरा माजी जिल्हा परिषद सदस्य दीपकसिंग राजपूत यांच्यावर सोपवण्यात आली आहे.  दैनिक सामनामध्ये याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. राजपूत यांच्याकडे जामनेर, मुक्ताईनगर आणि रावेर या तीन तालुक्यांची जबाबदारी टाकण्यात आलेली आहे. राजपूत हे शिवसेनेचे निष्ठावंत पदाधिकारी असून त्यांनी उध्दव ठाकरे यांच्या सोबत राहण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणून त्यांच्यावर ही जबाबदारी देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.