अरे बापरे… आता या भाजप नेत्याचा मृतदेह आढळला…

0

 

जम्मू-काश्मीर, लोकशाही न्यूज नेटवर्क;

सोमराज बेपत्ता असल्याचे सूत्रांनी सांगितले. आणि मंगळवारी त्यांचा मृतदेह गूढ परिस्थितीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आला, या संदर्भात हिरानगर पोलिसांनी कलम 174 सीआरपीसी नुसार तपासाची कार्यवाही सुरू केली आहे. कुटुंबीय आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली.

जम्मू-काश्मीरमधील कठुआ येथील हिरानगर शहरात मंगळवारी बेपत्ता झालेल्या भारतीय जनता पक्षाच्या नेत्याचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडला. सध्या मृत्यूचे नेमके कारण समजू शकले नाही. अशा परिस्थितीत तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हिरानगर शहरातील एका गावकऱ्याने घरापासून काही अंतरावर भाजप नेते सोमराज यांचा मृतदेह झाडाला लटकलेला पाहिला आणि पोलिसांना माहिती दिली.

रक्ताच्या थारोळ्यात असलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय (SDH) हिरानगर रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. कालपासून सोमराज बेपत्ता असून मंगळवारी गूढ परिस्थितीत झाडाला लटकलेल्या अवस्थेत सापडल्याचे सूत्रांनी सांगितले. या संदर्भात हिरानगर पोलिसांनी कलम 174 सीआरपीसी अंतर्गत चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे. कुटुंबीय आणि भाजपच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या मृत्यूची चौकशी करण्याची मागणी केली.

वैद्यकीय आणि कायदेशीर औपचारिकता पूर्ण केल्यानंतर मृताचा मृतदेह अंतिम संस्कारासाठी कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला. कठुआचे वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एसएसपी) आर.सी कोतवाल यांनी सांगितले की, या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एसडीपीओ बॉर्डरच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्यात आले आहे. “ज्या नेत्यांवर कुटुंबाने आरोप केले आहेत त्यांचीही चौकशी केली जाईल आणि जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई केली जाईल,” असे एसएसपी म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.