उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मिता वाघ आणि खा रक्षा खडसे उद्या दाखल करणार उमेदवारी अर्ज…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

भारतीय जनता पार्टी, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) मनसे रिपब्लिकन पार्टी (आठवले गट), रासप, पीआरपी(कवाडे गट) प्रहार, लहूजी शक्ती सेना महायुतीच्या जळगाव लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती स्मिता वाघ तसेच रावेर लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार श्रीमती खा रक्षा खडसे या उद्या गुरुवारी (ता.२५ एप्रिल) भाजप नेते व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भाजप नेते व राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, मदत व पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांच्या नेतृत्वाखाली महायुतीच्या घटक पक्षांकडून यावेळी भव्य शक्तिप्रदर्शन देखील करण्यात येणार आहे. सकाळी ११ वाजता भाजपा कार्यालय (जी.एम. फाउंडेशन) ते जिल्हाधिकारी कार्यालय, अशी भव्य पदयात्रा सुद्धा काढण्यात येणार आहे. तत्पूर्वी कोर्ट चौकातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याला मान्यवरांच्या हस्ते माल्यार्पण करण्यात येईल.

दोन्ही उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी यांच्या प्रमुख उपस्थितीत भव्य शक्तिप्रदर्शनाला सूरवात होईल.

या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन जळगाव शहराचे आमदार सुरेश उर्फ राजूमामा भोळे तसेच आमदार मंगेश चव्हाण, संजय पवार, आमदार संजय सावकारे, आमदार चंद्रकांत पाटील, माजी खासदार एम.के.पाटील, माजी खासदार ए.टी. नाना पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील, ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, अमोल जावळे , सौ. उज्वला बेंडाळे , नंदकिशोर महाजन , डॉ.राधेश्याम चौधरी, निलेश पाटील, रावसाहेब पाटील, वासुदेव पाटील , जमील देशपांडे, अभिषेक भाऊ पाटील , मीनल पाटील, सोनाली नारायण पाटील ,सरिता माळी-कोल्हे , गणेश सोनवणे, आनंद खरात, अनिल अडकमोल, राजू मोरे, दिनेश खरात, श्री.सुर्यवंशी यांनी महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.