लोकसभा निवडणुकीत भाजपच्या NDA ला मिळेल कौल ! ; सर्व्हे आला समोर ..

0

नवी दिल्ली ;- लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सने सर्व्हे केला असून त्याची आकडेवारी आता समोर आली आहे. ज्याआधारे भाजपाच्या जागा कितपत निवडून येतील, जागा जास्त मिळतील की कमी होतील याचा अंदाज बांधला आहे.

हे सर्व्हे इंडिया टीव्ही आणि सीएनएक्सकडून करण्यात आले आहेत. त्यात INDIA आघाडीनंतर लोकसभा निवडणुकीसाठी जनतेचा कौल कुणाच्या बाजूने असेल याबाबत माहिती घेण्यात आली. या सर्व्हेचा निकाल धक्कादायक होता.

या सर्व्हेनुसार तिसऱ्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान होण्याची शक्यता अधिक आहे. जर असे झाले तर नरेंद्र मोदी हे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर सलग तिनदा पंतप्रधानपदी निवड झालेले पहिले पंतप्रधान ठरतील. नेहरूंच्या रेकॉर्डची ते बरोबरी करतील.

सर्वेक्षणात भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला प्रचंड बहुमत मिळण्याची अपेक्षा आहे. एनडीए आघाडीला 318 जागा मिळू शकतात. तर विरोधी पक्षांच्या इंडियाला 175 जागा मिळतील, तसेच इतर पक्षांना 50 जागा मिळण्याची अपेक्षा आहे.विरोधकांच्या इंडियाला 24.9 टक्के मतं मिळण्याची अपेक्षा आहे. इतर पक्षांना 32.6 टक्के जास्त मतं मिळण्याचा अंदाज आहे. तर भाजपला 42.5 टक्के मतं मिळू शकतात.स्वबळावर जागा मिळवण्याबाबत बोलायचं झाल्यास काँग्रेसला 66 जागा मिळतील, तर भाजपला स्वबळावर 290 जागा मिळतील असा अंदाज आहे. मात्र, सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार भाजप आणि एनडीए या दोन्ही पक्षांच्या जागांमध्ये घट होणार असल्याचं बोललं जातंय.2019 च्या लोकसभा निवडणुकीत एनडीएला 353 जागा मिळाल्या होत्या, तर भाजप एकट्यानं 303 जागा जिंकल्या होत्या. 2019 च्या तुलनेत आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये एनडीएला 35 आणि भाजपला 13 जागा कमी पडण्याची शक्यता आहे.सर्वेक्षणात काँग्रेसच्या जागा वाढण्यार असल्याचं समोर आलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत पक्षाला 52 जागा मिळाल्या होत्या. तर आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसला वाढीव 14 जागा मिळण्याची शक्यता आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.