1 फेब्रुवारीपासून बँकिंगशी संबंधित अनेक नियम बदलणार

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क

1 फेब्रुवारी रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन बजेट सादर करतील. यामुळे देशाची अर्थव्यवस्था बदलणार असली तरी सर्वसामान्यांच्या जीवनावरही याचा परिणाम होणार आहे. बजेट व्यतिरिक्त जे महत्त्वाचे म्हणजे 1 फेब्रुवारीपासून काही बँकाही त्यांचे नियम बदलणार आहेत.

स्टेट बँक ऑफ इंडिया 1 फेब्रुवारीपासून पैसे ट्रान्सफर करण्याच्या नियमात बदल करणार आहे. ही बँक IMPS द्वारे रु. 2 लाख ते रु. 5 लाखांपर्यंतचे पैसे ट्रान्सफर करण्यासाठी रु. 20 + अधिक GST शुल्क आकारेल. ऑक्टोबर 2021 मध्ये, भारतीय रिझर्व्ह बँकने IMPS द्वारे व्यवहारांची रक्कम 2 लाख रुपयांवरून 5 लाख रुपये केली आहे. रिझर्व्ह बँकेने IMPS द्वारे व्यवहारांची मर्यादाही 2 लाखांऐवजी 5 लाख रुपये एका दिवसात वाढवली आहे.

बँक ऑफ बडोदा देखील 1 फेब्रुवारीपासून चेक क्लिअरन्सशी संबंधित नियम बदलत आहे. 1 फेब्रुवारीपासून चेक पेमेंटसाठी, ग्राहकांना पॉजिटीव्ह सिस्टमला फॉलो करावे लागेल. म्हणजेच चेकच्या संबंधित माहिती पाठवावी लागेल, तरच चेक क्लिअर होईल. हे बदल 10 लाख रुपयांवरील चेक क्लिअरन्ससाठी आहेत.

पंजाब नॅशनल बँक जे नियम बदलणार आहे त्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर होणार आहे. तुमच्या खात्यात पैसे नसल्याने हप्ता किंवा गुंतवणूक अयशस्वी झाल्यास, तुम्हाला 250 रुपये दंड भरावा लागेल. आतापर्यंत हा दंड 100 रुपये होता.

Leave A Reply

Your email address will not be published.