शिंदाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन

0

शिंदाड ता. पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क

जि प गटात विकासकामाची गंगा आणणारे सदस्य मधुभाऊ काटे यांच्या गटातील शिंदाड येथे प्राथमिक आरोग्य केंद्राचा उद्घाटन सोहळा खासदार उन्मेश पाटील यांच्या हस्ते करण्यात आला आहे.

या उदघाटन सोहळ्याला प्रमुख पाहूणे म्हणून जिल्हापरिषद अध्यक्षा जळगाव रंजना प्रल्हाद पाटील, पाचोरा, भडगाव तालुक्याचे आमदार किशोर आप्पा पाटील, जिल्हापरिषद जळगावचे उपाध्यक्ष लालचंद पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष अमोलभाऊ शिंदे, पाचोरा पंचायत समितीचे माजी सभापती सुभाष पाटील, तालुका आरोग्य अधिकारी समाधान वाघ, बीडीयो आतुल पाटील यांची उपस्थिती होती.

तसेच पिंपळगाव गटात विकासाची गंगा आणणारे विकास पुरुष मधुभाऊ काटे यांचे पाचोरा- भडगाव मतदार संघाचे आमदार किशोर आप्पा पाटील यांनी मधूभाऊ काटे तोंड भरुन कौतुक केले. खासदार उन्मेश पाटील यांनी पिंपळगाव- शिंदाड गटात विकासाची गंगा आणणारा विकास पुरुष अशी मधुभाऊ काटे यांना उपमा देऊन केलेल्या कामाची पावतीच दिली.

यावेळी सरपंच ज्ञानेश्वर तांबे व उपसरपंच नरेंद्र पाटील, सदस्य चेअरमन समाधान पाटील, पिंपळगाव व शिंदाड गटातील सर्व सरपंच तसेच अनेक मान्यवर, आशासेवीका, आरोग्यसेवक, ग्रामसेवक, पत्रकार,ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.