मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भावुक !

0

मुंबई लोकशाही न्यूज नेटवर्क

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे (Shiv Sena chief Balasaheb Thackeray) यांची आज जयंती (Birth Anniversary). त्याच निमित्ताने अनेक कार्यक्रम ठिकठिकाणी घेण्यात आले. त्यासोबतच विधिमंडळाने बाळासाहेबांच्या तैलचित्राचे अनावरण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या हस्ते करण्याचे ठरविले. त्याचदरम्यान माध्यमांशी बोलतांना त्यांचा कंठ दाटून आला. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधत आज, सोमवार रोजी विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात त्यांच्या तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Deputy Chief Minister Devendra Fadnavis) यांच्या हस्ते तैलचित्राचे अनावरण करण्यात येणार आहे. दरम्यान, माध्यमांशी बोलतांना मुख्यमंत्री शिंदे यांनी मला वेळोवेळी बाळासाहेब ठाकरेंची आठवण येते. असे भावुक वक्तव्य केले.

काय म्हणाले शिंदे?
बाबासाहेब यांचे योगदान केवळ राज्यात नव्हे तर जगभरात आहेत. आज बाळासाहेबांमुळेच सर्वसामान्य कार्यकर्ते अनेक मोठ्या पदावर आहेत. माझ्यासारखे कार्यकर्ते देखील त्यांच्याच विचारांनी प्रभावित आहे. त्यांच्यामुळे व त्यांच्या आशीर्वादामुळे आज मी या राज्याचा मुख्यमंत्री आहे. त्यांच्यामुळेच मला जनतेची सेवा करण्याचे भाग्य लाभले, असे म्हणत शिंदे यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

Leave A Reply

Your email address will not be published.