सोने चांदीच्या दरात पुन्हा वाढ ; जाणून घ्या आजचे दर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

मागील आठवड्यात सोन्याचांदीच्या दरांमध्ये वाढ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. मात्र आज जळगावच्या सराफ बाजारात सोने चांदीच्या दरात वाढ झाली असल्याचे दिसून आले. सुवर्णनगरी जळगावमध्ये आज सोमवार २३ रोजी सोन्याच्या दरात प्रति १० ग्रॅम ८० रुपयांनी वाढ झाली असून सोन्याचा दर हा ५६ हजार ९२० रुपये दुपारपर्यंत कायम होता. आठवड्याच्या सुरुवातीला ८० रुपयांनी सोने वधारले असून शनिवार आणि रविवार रोजी सोन्याचे दर प्रति १० ग्रॅम ५६ हजार ८४० रुपये इतका होता .

चांदीच्या दरातही आठवड्याच्या सुरुवातीला प्रति एक किलो २१० रुपयांची वाढ झाली असून आजचे चांदीचे भाव किलोमागे ६८ हजार ८५० रुपये होता. शनिवार आणि रविवारी चांदीचे भाव ६८ हजार ६४० प्रति किलो होते .

सध्या सर्वत्र लग्न सराई सुरु असून सोन्या चांदीच्या दागिन्यांना चांगली मागणी असल्याने दरात वाढ होताना दिसत असल्याचे सराफ बाजारातील तज्ज्ञांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.