मलकापुरात महाआरोग्य शिबिरात २७९ रुग्णांनी घेतला लाभ

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
मलकापूर तालुका कृषी विकास फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेड मलकापूर व डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २२ जानेवारी २०२३ रोजी महाआरोग्य शिबिरामध्ये मोफत टू डी इको, ई.सी.जी.कार्डीओग्राफ, स्त्रीरोग, नेत्रालय, नाक,कान,घसा, अस्थी रोग तज्ञांनी तपासणी केली.  तसेच या वेळी रक्तपेढीला २७ रक्त दात्यांनी रक्तदान केले या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या एकूण २७९ लोकांच्या तपासण्या डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय चे डॉ.सचिन संगतवार, डॉ.ऋषिकेश कुलकर्णी, डॉ.नेहा नारखेडे, डॉ.अनुजा चालाख, डॉ.अंकित भालेराव, डॉ.सय्यद बासू इत्यादी डॉक्टर चेमू ने तपासणी केल्या.

या वेळी महाआरोग्य शिबिराच्या प्रसंगी डॉ.वैभव पाटील (डी.एम कार्डिओलॉजिस्ट ) पंचायत समिती माजी सभापती नलिनीताई तळोले ,मलकापूर तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लि. मलकापूर च्या अध्यक्ष सौ.जोत्सना प्रशांत तळोले, कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक प्रशांत तळोले, भास्कर पाटील ,विवेक पाटील, विलास खर्चे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी प्रशांत तळोले हे शिबिरात आलेल्या सर्व महिला पुरुषांना मार्गदर्शन करतांना म्हणाले या भव्य महारोग्यशिबीर हे जनतेसाठीच आयोजित केले होते, बरेसच्या लोकांना आजार असतात पण पैसा अभावी उपचार करू शकत नाही त्या करिता डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय यांच्या सर्व डॉ. चेमुनी या आरोग्य शिबिरामध्ये मोफत तपासणी केली व रुग्णांना योग्य मार्गदर्शन केले.

जनसेवा हीच ईश्वर सेवा! समजून या आरोग्य शिबिराचे आयोजन केले होते , या भव्य महाआरोग्य शिबिरा प्रसंगी शेतकरी संघटनेचे नेते दामोदर शर्मा, कृषी विकास संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमित नाफडे,स्वाभिमानी संघटनेचे ललित डवले, सामाजिक कार्यकर्ते ज्ञा.ना. हिवाळे, व्यापारी संघटनेचे पप्पू तोष्णीवाल, शिक्षक पतसंस्थेचे संचालक रवींद्र तळोले, सामाजिक कार्यकर्ते अनिल खर्चे,विनोद खर्चे इत्यादीं मान्यवरांनी भेटी दिल्या.
हे भव्य महाआरोग्यशिबीर संपन्न करण्याकरिता श्रेयस तळोले ,किरण चौधरी,निलेश तांदूळकर,संजय बढे,अनुराग देशमुख, पुरुषोत्तम धोरण, उमेश पतील, विलास बोंबटकार, भगवान जाधव,दिपक किनगे यांनी अथक परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.