मुक्ताईनगरात ब्राह्मण समाज वार्षिक मेळावा उत्साहात

0

लोकशाही न्यूज नेटवर्क
श्री संत मुक्ताई ब्राह्मण सेवा संघ मुक्ताईनगर यांचेकडून ब्राह्मण समाज वार्षिक मेळावा 22 रोजी मुक्ताईनगर येथे बाळासाहेब फडणीस यांचे जागेमध्ये संपन्न झाला.
कार्यक्रमास अध्यक्षस्थानी महिला ब्राह्मण संघ औरंगाबाद विजयाताई कुलकर्णी व ब्राह्मण महासंघ पुणे विश्वजीत देशपांडे,जळगाव ब्राह्मण महासंघ अध्यक्ष व्ही पी कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली श्री संत मुक्ताई ब्राह्मण सेवा संघ यांचे अध्यक्ष रवींद्र डांगे व उपाध्यक्ष गायत्री ब्रह्मक्षत्रिय त्यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकर्ते व पदाधिकारी संकेत पाटील , अजय फडणीस , विजय कुलकर्णी ,,गणेश ब्रह्म क्षत्रिय , विवेक निर्मळ ,युवराज ब्रह्मक्षत्रिय , चंद्रशेखर जोशी, चंद्रशेखर पुराणिक , अरविंद डांगे,अभिनव नाईक ,अजय कुलकर्णी , प्रसन्न कुलकर्णी ,डीडी कुलकर्णी ,मोहन मुळे ,रवींद्र पवित्रे यांचे सहकार्याने कार्यक्रम पार पडला कार्यक्रमामध्ये ब्राह्मण समाज एकत्रीकरण व आर्थिक सबलीकरण या विषयावर विमोचन करण्यात आले.

तसेच सदरचे कार्यक्रम मध्ये समाजातील गुणवंत विद्यार्थी यांचे बक्षीस वितरण करण्यात आले.
आणि कार्यक्रमांमध्ये महिलांचे हळदीकुंकू महिला सदस्य धनश्री कुलकर्णी ,गायत्री ब्रह्मक्षत्रिय , जयश्री कुलकर्णी , प्रीती कुलकर्णी ,अश्विनी पुराणिक,अश्विनी फडणीस , अंकिता काकोडकर या महिला कार्यकर्त्यांनी भाग घेऊन संक्रांतीच्या हार्दिक कुंकू केले.सर्व कार्यक्रमाचे अंतिम पसायदान करून सांगता केली.

Leave A Reply

Your email address will not be published.