फोटो व्हायरल करण्याची धमकी ; तरुणीवर अत्याचार

0

चाळीसगाव ;- लग्नाचे आमिष दाखवत तरूणीवर वेळोवेळी अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून मोबाईलमधील फोटो व्हायरल करण्याची धमकीसुद्धा देणाऱ्या तरुणावर चाळीसगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संशयित आरोपी विष्णू उर्फ विश्वनाथ संतोष पवार याने २० वर्षीय तरूणीला लग्नाचे आमिष दाखवून २०१९ तो तिच्यावर अत्याचार करीत होता . मात्र त्यानंतर त्याने माझ्या मोबाईलमधील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करून तुझी बदनामी करेल अशी धमकी दिली. पिडीत तरूणीने लग्नाची मागणी केली परंतू संशयित आरोपी विष्णू पवार याने लग्नास नकार दिल्याने चाळीसगाव शहर पोलीस ठाण्यात तरुणीने तक्रार दिली. त्यानुसार संशयित आरोपी विष्णू उर्फ विश्वनाथ संतोष पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर ढिकले पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.