अनधिकृतपणे झाडे तोडणाऱ्यावर गुन्हा दाखल

0

जळगाव ;- मोकळ्या जागेवर असणारी दोन कडुलिंबाची झाडे तोडून महापालिकेने बजावलेली २५ हजारांची दण्डाची रक्कम न भरणाऱ्या एकाविरुद्ध पर्यावरणाचा ऱ्हास केल्याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेडी शिवारातील गट नंबर ४८/१ मधील मोकळ्या जागेवर असलेले दोन कडू निंबाची झाडे लावली होती. चंद्रकांत पांडूरंग जोशी रा. खेडी ता.जि.जळगाव यांनी ६ एप्रिल रोजी दुपारी १ वाजता सदरील दोन निंबाची झाडे व एका झाडाची फांदी तोडून टाकली. यासंदर्भात जळगाव महापालिकेने चंद्रकांत जोशी यांना २५ हजाराच्या दंडाची नोटीस बजावली होती. दरम्यान महापालिकेने बजावलेली नोटीसीची कोणतीही दखल न घेतल्याने महापालिकेचे अधिकारी बाळासाहेबत बळवंतराव चव्हाण यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार चंद्रकांत जोशी यांच्या विरोधात पर्यावरण संरक्षण अधिनियम कायद्यांतर्गत एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुरूवार १५ जून रोजी दुपारी १ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक दत्तात्रय पोटे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.