जळगावातून कार लांबविली ; गुन्हा दाखल

0

जळगाव ;-दुचाकी लांबविण्याचे प्रकार सर्रास सुरु असताना आता चोरटयांनी आपला मोर्चा कार चोरीकडे वाळविल्याचे समोर आले असून अयोध्यानगरात एका हॉटेलसमोर लावलेली कार अज्ञात चोरटयांनी पळवून नेल्याची घटना १४ जून रोजी उघडकीस आली असून याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यात असोदा या गावामध्ये राहणारे पराग पाटील यांच्या मालकीची एम एच 19 बी यु 0500 या क्रमांकाची कार असून त्यांनी आपल्या मामाच्या घरासोमर मोकळ्या जागेत कार लावली होती सकाळी उठल्यावर जागेवर कार नसल्याचे लक्षात आल्यानंतर कारचा शोध घेऊनही ती सापडली नसल्याने पराग पाटील यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनला कार चोरीची तक्रार दिल्यावरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.