बिपोरजॉयचा जोरदार तडाखा, संपूर्ण बाजारपेठ ठप्प

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

यंदाच्या बिपोरजॉय वादळामुळे भरपूर नुकसान झाले असून बाजारपेठ ठप्प झाली आहे. यंदाच्या पाहिल्या चक्रीवादळामुळे देशाच्या पश्चिम किनारपट्टीला जोरदार तडाखा बसला आहे. नुकसान भरपूर प्रमाणात झाले असून त्याचे आकडे चक्रावून टाकणारे आहे. या वादळानमुळे रेल्वे, बंदर, आणि विमानसेवाच प्रभावित न होता इतर छोट्या-मोठ्या व्यवसायांचे सुद्धा फार नुकसान झाले आहे. पत्रसूचना कार्यालयाने दिलेला आकडा धडकी भरवणारा आहे. गुजरात मधील ८९००० घरे आणि झोपड्यांची पडझड आली आहे, ८६००हुन अधिक गुरे मृत पावली आहे. दीड लाख हेक्टरवरील पीक नष्ट झाली आहे. मच्छीमारांच्या ४७५ नावांचे सुद्धा नुकसान झाले आहे. केंद्र सरकारकडे गुजरात राज्याने ९८०० कोटी रुपयांहून अधिकची मदत मागितली आहे, यावरुनच किती कोटींचा फटका या राज्याला बसला हे स्पष्ट होते.

रेल्वे, विमानसेवा ठप्प
वादळाचे पाडसाद रेल्वे आणि विमानसेवेवर देखील झाले असून बिपरजॉयमुळे जवळपास १०० रेल्वे रद्द करण्यात आल्या. जामनगर एअरपोर्टवरील विमानसेवा बंद करण्यात आली. एवढेच नाही तर मीठागरं बंद करण्यात आली. किनारपट्टीलगतची ३५० हून अधिकची कारखान्यांना कुलूप लावण्यात आले. लघु-मध्यम ६७०० कारखाने, उद्योग बंद करण्यात आली. हजारो हॉटेल्स, किराणा दुकान, रस्त्यावरील हॉकर्स यांच्या व्यवसायावर प्रतिकूल परिणाम झाला. दोनच दिवसातील अंदाजानुसार, ५०० ते १००० कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.