जाहिरातींवरून मुख्यमंत्र्यांसह शिवसेनेवर शरद पवारांची टीका

0

जळगाव / अमळनेर : – वृत्तपत्रांमध्ये देण्यात आलेल्या जाहिरातींवरून वादंग निर्माण झाले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या भाषणात म्हटले कि, या जाहिरातीमुळं आम्हा लोकांच्या ज्ञानात भर पडली की, भाजपचं यामध्ये योगदान जास्त नाही अन्य घटकांच आहे. हे महाराष्ट्राला कळवण्याचं ऐतिहासिक काम या जाहिरातीच्या माध्यमातून झालं आहे. त्याबद्दल त्यांना धन्यवाद. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेनेवर आज अमळनेरात शरद पवार यांनी टीका केली .

विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील ,एकनाथराव खडसे , अरुणभाई गुजराथी आ. अनिल पाटील ,रवींद्र पाटील आदी व्यासपीठावर उपस्थित होते.

आपल्या भाषणात टोला मारताना शरद पवार म्हणाले कि, महाराष्ट्राचं हे भाग्य आहे की अत्यंत लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून एका व्यक्तीच्या बद्दलचा नावलौकिकाची जाहिरात त्यांच्या कुठल्या हितचिंतकांनी दिली हे आम्हाला माहिती नाही. आमचा समज असा होता की हे जे सरकार बनलं आहे यामध्ये मोठी संख्या ही भाजपची आहे.

या जाहिरातीमुळे भाजप आणि शिवसेनेत कुरबुरी सुरु झाल्या आहेत. त्यामुळं मोठ्या टीकेनंतर शिवसेनेला पुन्हा जाहिरात देत खुलासा द्यावा लागला होता, एवढ्या मोठ्या जाहिरातील सर्व वृत्तपत्रांना दिल्या आहेत. प्रिंट मीडियाच्या दृष्टीनं ही लाभदायक गोष्ट ठरली आहे.असे शरद पवार म्हणाले.

अजित पवार, जयंत पाटील,अनिल पाटील यांचा अमळनेरात रोड शो

आमदार पाटील यांच्या निवासस्थानापासून खुल्या जीपमध्ये बसून विरोधी पक्षनेते अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील , आणि आ. अनिल पाटील यांनी शहरात आज सकाळी रोड शो केला. मिरवणूक अरिहंत चौक, तहसील कार्यालय ,महाराणा प्रताप चौक, मंगलमूर्ती चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहाजवळ पोहचली.

Leave A Reply

Your email address will not be published.