अपघातात खडकदेवळा येथील जवानाचा मृत्यू

0

पाचोरा : आयशर ट्रक व दुचाकीच्या अपघातात तालुक्यातील खडकदेवळा येथील जवानाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना १४ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास पाचोऱ्यातील जारगाव चौकाजवळ घडली. खडकदेवळा येथील रहिवासी नितीन प्रकाश पाटील (वय ३३) हे १४ फेब्रुवारीला रात्री ८ वाजेच्या सुमारास खडकदेवळा येथून पाचोरा येथे येत होते. शहरातील जारगाव चौकाजवळ पाचोऱ्याच्या दिशेने येणाऱ्या आयशरच्या धडकेत नितीन पाटील यांचा जागीच मृत्यू झाला. नितीन पाटील हे बीएसएफमध्ये सेवा बजावत असताना त्यांना काही अपरिहार्य कारणास्तव बीएसएफमधुन कार्यमुक्त करण्यात आले होते. नितीन पाटील यांच्या पश्चात्य आई, वडील, पत्नी, २ मुले, भाऊ असा परिवार आहे. या प्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत अपघाताची नोंद करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.