अमेझॉन, फ्लिपकार्टवरून शॉपिंग करणे ठरणार डोकेदुखी, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

जर तुम्ही देशातील मोठ्या ऑनलाईन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर, अमेझॉनसह फ्लिपकार्डवरून सामान, वस्तू खरेदी करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. या दोन्ही ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मने त्यांच्या Replacement Policy मोठा बदल केला आहे. त्यामुळे तुम्ही खरेदी केलेली एखादी वस्तू खराब जर झाली तर, तुम्हाला आता ती लगेच बदलून मिळणार नाही. तुमच्या डोक्याला विकतचा ताप होणार आहे. वस्तू विकत घेऊन ती बदलण्यासाठी मनस्ताप होईल, काय झाला आहे बदल? जाणून घ्या..

ॲमेझॉनसह फ्लिपकार्टने केला मोठा बदल
ॲमेझॉनसह फ्लिपकार्ट या दोन्ही कंपन्यांनी त्यांच्या डिजिटल रिप्लेसमेंट पॉलिसीमध्ये बदल केला आहे. या कंपन्यांनी ७ दिवसात वस्तू बदल करण्याची योजना बंद केली आहे. पूर्वी या कंपन्या खराब अथवा वेगळी वस्तू पाठविल्यास बदलून देत होते. त्याऐवजी अमेझॉन, फ्लिपकार्टने आता सर्व्हिस सेंटरचा रस्ता दाखवला आहे. त्यामुळे तुम्हाला खराब वस्तू बदलायची असेल तर सर्व्हिस सेंटर सापडवून तिथे वस्तू द्यावी लागेल. त्यानंतर नवीन उत्पादन येईपर्यंत या सेवा केंद्राच्या फेऱ्या माराव्या लागतील.

आता वस्तू बदलने अवघड
जर तुम्ही अमेझॉन, फ्लिपकार्टवरून एखादी डिजिटल वस्तू, उद्पादन, खरेदी केल्यास त्यात स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इअरबड्स खरेदी केल्यास तुमच्या जवळचे सर्व्हिस सेंटर कुठे आहे. त्याची माहिती घेऊन ठेवा, जर हे उद्पादन खराब निघाले तर तुम्हाला तात्काळ सेवा केंद्रावर जाऊन त्यासंबंधीची तक्रार करता येईल आणि हे उद्पादन कधी मिळणार याची माहिती घेता येईल, पण या धोरणामुळे ग्राहकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागणार हे मात्र नक्की

Leave A Reply

Your email address will not be published.