लोकशाही न्यूज नेटवर्क
टीव्ही मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. उडान मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री कविता चौधरीच निधन झाल्याची बातमी समोर आली आहे. उदा मालिकेमधून तिन आयपीएस महिला अधिकाऱ्याची भूमिका पार पडली होती. त्यात तिने केलेल्या कल्याणी सिंहच्या भूमिकेचे प्रेक्षकांनी कौतुक केले.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ६७ वर्षीय कविताच निधन हदयविकाराच्या धक्क्यानं झालं आहे. नॅशनल स्कुल ऑफ ड्रामामध्ये तिचे सहकारी असलेल्या अनंग देसाई यांनी ही माहिती दिली आहे. काल रात्री कविता यांचे निधन झाल्याचे सांगण्यात येत आहे.
कविताचा भाचा अजयने अधिक माहिती देताना सांगितले की, गेल्या तीन ते चार दिवसांपासून कविता ही एका रुग्णालयात दाखल होती. काल रात्री साडेआठच्या सुमारास निधन झालं.