दिल्लीतील पेंट फॅक्टरीत भीषण आग, ११ जण मृत्युमुखी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

राजधानी दिल्लीतील अलीपूर भागातील एका पेंट फॅक्टरीमध्ये गुरुवारी भीषण आग लागली. त्यामध्ये एकूण ११ लोकांचा होरपळून मृत्यू झाला येथील एका पेंट फॅक्टपरीमध्ये काही मजूर काम करत होते. मात्र अचानक लागलेल्या आगीने क्षणात रौद्ररूप धारण केले आणि बाहेर पडू न शकल्याने कामगारांचा होरपळून मृत्यू झाला. ही आग इतकी भयानक होती. की आगीचा लोळ दूरपर्यंत दिसत होत्या. आगीमुळे एकच गदारोळ माजला होता.

केवळ ती फॅक्टरीमध्येच नव्हे तर आजूबाजूच्या काही घरांचे व दुकानाचेही भयानक नुकसान झाले आहे. त्यामुळे फॅक्टरीमध्ये मजुरांशिवाय काही स्थानिकांचीही मृतांमध्ये समावेश असावा अशी शंका व्यक्त होत आहे. मात्र अद्याप कोणत्याही मृतांची ओळख पडू शकलेली नाही. अग्निशमन दलाचे जवान रात्री उशीरापर्यंत आगीवर नियंत्रण मिळवण्याचा, ती विझवण्याचा प्रयत्न करत होते. अखेर पहाटेच्या सुमारास आग विझवण्यात यश मिळालं.

अग्निशमन दलाच्या २२ गाड्या घटनास्थळी
गुरुवारी संद्याकाळच्या सुमारास अलीपूर येथील पेंट फॅक्टरीमध्ये अचानक आग लागली. आगीचं रूप एवढं अक्राळविक्राळ होत की, दूरपर्यंत आगीच्या ज्वाला दिसत होत्या, धग जाणवत होती. आगीमुळे उठत असलेले धुराचे लोट काही किलोमीटर दूरपर्यंत दिसत होते. आजूबाजूच्या घरांमध्येही हा धूर पसरल्याने काही लोक बेशुद्ध झाल्याची माहिती समोर आली. यामध्ये जखमी झालेल्या तिघांना नजीकच्या रुग्णालयात पाठवण्यात आले. अग्निशमन दलाच्या 22 गाड्यांनी अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्यात आणली, मात्र तोपर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला होता. अलीपूरमध्ये केशव नगर आणि इब्राहिमपूरमध्येही अनेक रसायनांची गोदामे बांधण्यात आली आहेत. मात्र ये संपूर्ण परिसरात, अचानक आगीचा सामना करण्यासाठी कोणत्याही योग्य उपाययोजना नाहीत.

होरपळले ११ मृतदेह ताब्यात
ज्या फॅक्टरीमध्ये ही आग लागली ती सोनीपत येथील अशोक जैन यांचा मुलगा अखिल जैन चालवतो. आगीची बातमी कळताच अग्निशमन दलासह एनडीआरएफ घटनास्थळी पोहोचले आणि जळालेल्या इमारतींमध्ये शोधमोहीम राबवण्यास सुरुवात केली. पेंट फॅक्टरीमधून होरपळलेले एकूण ११ मृतदेह सापडले असून, त्यात १० पुरुष आणि एका महिलेचा समावेश आहे. मृतदेह बीजेआरएम रुग्णालयात सुरक्षित ठेवण्यात आला असून मृतांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. याप्रकरणी अलीपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.