बीसीसीआय नव्या कोचच्या शोधात : द्रविड यांची मुदत जूनपर्यंत

0

मुंबई, लोकशाही न्युज नेटवर्क –

पुढील महिन्यात आयसीसी टी-२० वर्ल्डकप खेळणाऱ्या भारतीय क्रिकेट संघासाठी एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय लवकरच संघाच्या मुख्य प्रशिक्षक पदासाठी जाहिरात प्रसिद्ध करणार आहे. बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मुंबईत हे स्पष्ट केले. भारताचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांची मुदत जूनपर्यंत आहे. अशाच बोर्डाने नव्या प्रशिक्षकाचा शोध सुरू केला आहे.
जय शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार नवा प्रशिक्षक हा मोठ्या कालावधीसाठी नियुक्त केला जाईल आणि सुरुवातीला ते ३ वर्षाच्या कालावधीसाठी काम करतील. कोचिंग स्टाफमधील अन्य सदस्य म्हणजे फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षणाचे कोच यांची निवड नव्या कोचच्या सल्ल्यानुसार नंतर केली जाणार आहे. शहा यांनी भारतीय संघासाठी परदेशी कोच मिळण्याची शक्यता नाकारली नाही.
राहुल द्रविड पुन्हा अर्ज करू शकतात

बीसीसीआयचे सचिव शहा म्हणाले, जर राहुल द्रविड पुन्हा अर्ज करणार असतील तर करू शकता. भारतीय संघाचा नवा कोच भारतीय असेल की परदेशी हे आम्ही नाही ठरवू शकत नाही. याच बरोबर त्यांनी हे देखील स्पष्ट केले की, वेगवेगळ्या फॉर्मेटसाठी वेगवेगळे कोच नियुक्त करण्याचा आम्ही विचार करत नाही आहोत. अशा पद्धतीने इंग्लंड आणि काही काळापूर्वी पाकिस्तानने वेगवेगळे कोच नियुक्त केले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.