छत्तीसगड, लोकशाही न्युज नेटवर्क
छत्तीसगडमधील कावर्धा येथून मोठी बातमी समोर आली आहे. पिकअप वाहन पलटी झाल्याने १७ जण ठार झाले आहेत. तर २५ हून अधिक जण जखमी जाले आहेत. या भीषण अपघातीत सर्वजण आदिवासी असून, मृतांमध्ये १० महिलांचा समावेश असल्याची माहिती मिळाली आहे.
बैगा आदिवासी समाजातील 25-30 लोकांचा एक गट तेंदूपत्ता गोळा करून पिकअप ट्रकमधून परतत होता. दरम्यान बहपनी परिसरात त्यांचे वाहन 20 फूट खोल खड्ड्यात पडून हा अपघात झाला आहे. जखमींना पुढील उपचारासाठी जवळच्या जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हे सर्व कुई येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
जखमींना उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे, अशी माहिती कावर्धाचे पोलिस अधिक्षक अभिषेक पल्लव यांनी दिली आहे.
अपघातावर शोक व्यक्त
अपघाताबाबत उपमुख्यमंत्री अरुण साओ म्हणाले की, वाहनाचा ब्रेक निकामी झाल्यामुळे ते नियंत्रणाबाहेर गेल्याची प्राथमिक माहिती आहे. सविस्तर माहिती काही वेळाने कळेल. प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून, तपासानंतरच अपघाताचे कारण समजेल, असे ते म्हणाले. प्रशासन जखमींना सर्वतोपरी मदत करत आहे.