धक्कादायक; अमेरिकेने भारतीय कंपनीवर लादले निर्बंध…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

इराणशी व्यवहार केल्याच्या आरोपावरून अमेरिकेने एका भारतीय कंपनीवर मोठी कारवाई केली आहे. बायडेन सरकारने दक्षिण आणि पूर्व आशियातील 8 कंपन्यांवर इराणकडून हजारो कोटींची पेट्रोलियम आणि रासायनिक उत्पादने खरेदी करण्यावर बंदी घातली आहे. यामध्ये तिबालाजी पेट्रोकेम प्रायव्हेट लिमिटेड नावाच्या मुंबईस्थित भारतीय कंपनीच्या नावाचाही समावेश आहे.

अमेरिकेकडून इराणशी व्यवहार केल्याच्या आरोपावरून भारतीय कंपनीवर कारवाई करण्याची ही पहिलीच वेळ आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी डिपार्टमेंटने सांगितले आहे की इराणवर अमेरिकेच्या निर्बंधानंतरही काही पेट्रोकेमिकल उत्पादने खरेदी करणाऱ्या इराणी दलाल आणि हाँगकाँग, यूएई आणि भारतातील काही कंपन्यांवर अमेरिकेने कारवाई केली आहे.

भारतीय पेट्रो कंपनी तिबालाजीवर बंदी घातलेल्या इराणी ब्रोकर कंपनी ट्रिलियन्स पेट्रोकेमिकल आणि पर्शियन गल्फ पेट्रोकेमिकल इंडस्ट्री कमर्शियलच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांची पेट्रोकेमिकल उत्पादने चीनमधून खरेदी केल्याचा आरोप आहे.

अमेरिकेने इराणच्या या दोन्ही ब्रोकर कंपन्यांवर बंदी घातली आहे. अमेरिकेच्या ट्रेझरी विभागाने इराणशी व्यवहार केल्याप्रकरणी एका भारतीय कंपनीसह एकूण आठ कंपन्यांवर निर्बंध लादले आहेत. यामध्ये यूएई, चीन आणि हाँगकाँगमधील कंपन्यांचा समावेश आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.