धक्कादायक; जळगावात व्हॉटसअॅप ग्रुप अॅडमिनवर गुन्हा दाखल; पोलीस दलाबद्दल विवादित चॅटींग…

0

 

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क:

शहरात “भ्रष्टाचार विरोधी मंच” या नावाच्या व्हॉटसअॅप ग्रुपवर पोलीस दलाची बदनामी होईल अशी आक्षेपार्ह्य चॅटींग सुरु होती. याबाबत शनिपेठ पोलिस स्टेशनमध्ये संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त असे की, पो.ना. अभिजित सैंदाणे यांच्या फिर्यादी वरून. “भ्रष्टचार विरोधी मंच” या व्हॉटसअॅप गृपवर २७ सप्टेंबर रोजी सकाळी ११.४७ ते १२.५१ दरम्यान वृत्तपत्रात आलेली बातमी एकाने टाकली. त्यानंतर पोलीस दलाची त्यातून बदनामी होईल अश्या आशयाची चॅटींग काहींनी यावेळी सुरु केली.

याप्रकरणी फारुख कादरी (ग्रुप अॅडमिन), सचिन पांडे (ग्रुप अॅडमिन), 9284843511 (ग्रुप अॅडमिन). 9404559510 (ग्रुप अॅडमिन), शेख इरफान, नजीम (पूर्ण नाव माहित नाही) यांच्याविरुद्ध पोलीस दलाची बदनामी व अपप्रचार केल्या संबंधी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.