सातबारा उताऱ्यावर बोजा घेण्यासाठी लाच घेतांना एकाला अटक…

0

 

पाचोरा, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

पाचोरा तलुक्यातील सातबारा उताऱ्यावर बोजा बसवण्याचे शासकीय काम तलाठ्याकडून करून देण्यासाठी १ हजार ३६० रुपयांची लाच मागून ती स्वीकारणाऱ्या खाजगी पंटराला जळगाव एसीबीच्या पथकाने दि १७ रोजी दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास अटक केली. पाचोरा तालुक्यातील बांबरूड येथील भगवान कुंभार (४४) असे अटकेतील संशयिताचे नाव असून ही कारवाई बांबरूड येथे संशयिताच्या घरी करण्यात आली.

मिळालेल्या माहितीनुसार, लासगाव येथील तक्रारदार यांच्या आईच्या नावावर शेती असून त्यांनी १ लाख ३० हजारांचे पीक कर्ज घेतले आहे. शेतीच्या सातबारा उताऱ्यावर कर्जाचा बोजा लावण्यासाठीचे काम पाचोरा येथील कार्यालयातून करून देतो म्हणून भगवान दशरथ कुंभार (४४) बांबरूड (राणीचे), ता. पाचोरा यांनी तक्रारदाराकडे १ हजार ३६० रुपयांची लाच मागितली. मात्र तक्रारदाराने जळगाव एसीबीकडे मंगळवारी तक्रार दिली. तक्रार नोंदवताच सापळा रचून दुपारी 12.30 वाजेला बांबरुड येथील आरोपीच्या घरा जवळ त्याप्रमाणे कारवाई करण्यात आली.

हा सापळा नाशिक एसीबीच्या पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली जळगाव एसीबीचे पोलीस उप अधीक्षक शशिकांत पाटील यांच्या नेतृत्वात, नाशिक अप्पर पोलीस आधीक्षक एन एस न्याहालदे, वाचक पोलीस अधीक्षक नरेंद्र पवार नाशिक यांचे मार्गदर्शनात निरीक्षक श्रीमती. पीआय सँजोग बच्छाव, सहा. फौजदार दिनेशसिंग पाटील,सुरेश पाटील, सुनील पाटील,पो हे का रवींद्र घुगे,पो.ना.जनार्दन चौधरी,किशोर, सूनिल वानखेडे, बाळू मराठे,अमोल सुर्यवंशी, प्रणेश ठाकूर महाजन, एन एन जाधव, पो.ना ईश्वर धनगर, राकेश दुसाने यांच्या पथकाच्या सहाय्याने सापळा यशस्वी झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.