उच्च न्यायालयाची ताकीद; औरंगाबादच म्हणायचं….

0

 

औरंगाबाद, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

महाराष्ट्रात सत्तांत होताच नामांतराच्या घडामोडींना वेग आला होता आणि त्या प्रमाणे औरंगाबाद आणि धाराशिव शहराचे नामांतर देखील झाले होते. आणि त्याला केंद्राने देखील मंजुरी दिली होती. यावेळी औरंगाबादचं शहरचे नाव छत्रपती संभाजीनगर करण्यात आलं आहे. सर्वत्र आता छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख केला जात आहे. पण आता शासकीय कामांमध्ये औरंगाबाद असाच उल्लेख करावा, असे निर्देश मुबंई उच्च न्यायालयाने दिले आहे. औरंगाबाद नावाबाबात सर्व प्रसार माध्यमांनी वृत्तपत्रांनी मुबंई उच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे, असा आदेश काढण्यात आला आहे.

असे असले तरीही लोकशाहीचा चौथा आधार स्तंभ म्हटला जाणारा मीडिया, प्रसार माध्यम वृत्तपत्रे औरंगाबादचे नाव औरंगाबाद न छापता बेकायदेशीर छत्रपती संभाजीनगर असा उल्लेख करीत आहेत. त्यामुळे मुबंई उच्च न्यायालयाचे आदेशाचे प्रसार माध्यमाकडून अवमान होत आहे. त्यामुळे सर्व प्रसार माध्यमांनी औरंगाबादचे नाव औरंगाबादच वापरावे तसंच मुबंई उच्च न्यायालयाचे आदेशाचे पालन करावे अशी तक्रार याचिकाकर्ता सय्यद अंजारोद्दीन कादरी यांनी अध्यक्ष व मुख्य सचिव (तक्रार निवारण) भारतीय प्रेस परिषद, दिल्ली व इतर राज्यस्तरीय, तथा विभागीय स्तरीय कार्यालयात केली आहे.

त्यानंतर आता शासकीय कार्यालय आणि प्रसार माध्यमांमध्ये छत्रपती संभाजीनगर ऐवजी औरंगाबाद असा उल्लेख करावा, असे आदेश देण्यात आले आहे. तसंच, उच्च न्यायालयाचे पुढील आदेश येईपर्यंत महसूल व इतर विभागांशी संबंधित कोणत्याही कार्यालयाने ‘औरंगाबाद’ हेच नाव लिहावे असे आदेशही मुबंई उच्च न्यायालयाने दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.