विद्यार्थ्यांनो “३१ मे” ला बारावीचा निकाल लागू शकतो…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

फेब्रुवारी – मार्च महिन्यात इयत्ता दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा पार पडल्या. त्यानंतर अभ्यासाच्या टेन्शनला बाजूला सारून मुलांनी मनसोक्त अश्या उन्हाळी सुट्ट्यांची मज्जा मस्ती केली. आता विद्यार्थ्यांचं लक्ष या परीक्षांच्या निकालांकडे लागून आहे.

यातच आज मोठी बातमी समोर येत आहे. अवघ्या काही दिवसांतच Maharashtra State Board कडून बारावीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले जाणार आहे. थोडक्यात बोर्डाच्या परीक्षांच्या निकालांसंबंधीची तयारी पूर्ण झाल्याची माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.

मे महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात इयत्ता बारावीचा निकाल 31 मे 2023 रोजी जाहीर होण्याची शक्यता असून, तर जूनच्या पहिल्या आठवड्यात इयत्ता दहावीचे निकाल आता जाहीर होणार आहेत. बोर्डाकडून निकालाची तयारी पूर्ण झाल्याची माहिची अध्यक्ष शरद गोसावी यांनी दिली.

त्यामुळं करिअरच्या दृष्टीने घेतलेल्या निर्णयांवर आता या वर्गांकडून शेवटची नजर टाकली जात आहे. निकाल जाहीर झाल्यानंतर लगेचच पुनर्मुल्यांकन आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियांना सुरुवात होईल.

इयत्ता दहावी आणि बारावीचे निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांना बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे. जिथं गेलं असता प्राथमिक माहितीचा तपशील भरून त्यांना Marksheet पाहता येईल.

निकाल पाहण्यासाठी  https://www.mahahsscboard.in/ या संकेतस्थळासोबत विद्यार्थी किंवा पालक http://mahresult.nic.in , http://hscresult.mkcl.org/  आणि http://mahresults.org.in या लिंकवर जाऊन निकाल पाहू शकतात.

निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या संकेतस्थळावर भेट दिल्यानंतर पुढे बारावी (HSC) आणि दहावी (SSC) पैकी अपेक्षित पर्याय निवडावा. पुढे हॉलतिकीट क्रमांक आणि इतर माहितीचा तपशील भरावा आणि त्यानंतर काही क्षणांतच निकालाचे आकडे तुमच्यासमोर असतील. एकाच वेळी राज्यातील विविध भागांतून विद्यार्थी आणि पालक या संकेतस्थळावर भेट देणार असल्यामुळं काहींना निकाल पाहताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळं तांत्रिक अडथळे उदभवल्यास विद्यार्थ्यांनी घाबरून जाऊ नये हे एकच आवाहन.

Leave A Reply

Your email address will not be published.