मोठी बातमी.. अनिल देशमुख ईडी कार्यालयात दाखल; व्हायरल झाला फोटो

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

अखेर माजी गृहमंत्री अनिल देशमुख  ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. ते ईडीच्या कार्यालयात दाखल झाल्याचा फोटो व्हायरल झाला आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, ते आज आपला जबाब नोंदवणार आहेत.

100 कोटी वसुलीप्रकरणी  आरोप असलेले अनिल देशमुख अनेक दिवसांपासून गायब होते. अनिल देशमुख यांना 4 ते 5 वेळा समन्स बजावल्यानंतरही ईडीसमोर हजर राहिले नव्हते. त्यामुळे त्यांना त्यांच्या नावानं लूक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आलं होतं. तसंच देशमुख यांचा शोध घेण्यासाठी ईडीकडून सीबीआयकडे मदत मागण्यात आली होती.

अनेक महिन्यांपासून अनिल देशमुख आणि कुटुंबीय गायब होते. अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी चार ते पाच वेळा धाडी टाकण्यात आल्या होत्या. मात्र धाडी सत्रानंतरही देशमुख ईडीसमोर हजर राहिले नाहीत. ईडीनं अनिल देशमुखांच्या नागपूर, मुंबई आणि वर्ध्यातील घरी ईडीने छापेमारी करत कारवाई केली होती. ईडीनं त्यांना अनेकदा समन्स बजावलं मात्र ईडीसमोर हजर न राहता वकिलांच्या माध्यमातून न्यायालयात याचिका दाखल करत होते. सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत. अनिल देशमुख यांचा मुलगा ऋषिकेश देशमुख यांनाही ईडीनं वारंवार समन्स बजावलं होतं.

 

Leave A Reply

Your email address will not be published.