धक्कादायक.. पत्नीच्या निधनाचा धसका; पतीनेही घेतला गळफास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

शहरातील रामेश्वर कॉलनी या भागातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीचा आजाराने मृत्यू झाल्याचा धसका घेत पतीने देखील राहत्या घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याची  घटना आज समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अरूण खंडू सोनवणे (वय ४७, रा. लाडली ता. धरणगाव ह.मु. नागसेन नगर, रामेश्वर कॉलनी जळगाव) असे गळफास घेतलेल्या प्रौढाचे नाव आहे. अरूण सोनवणे हे पत्नी मीराबाई आणि मुलगा अनिकेत यांच्यासह राहतात. जळगाव कृषि उत्पन्न बाजार समितीत हमालीचे काम करून कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. गेल्या काही महिन्यांपासून त्यांची पत्नी मिराबाई सोनवणे ह्या दुर्धर आजार जडला होता. त्यांनी काही दिवसांपुर्वी मुंबई येथे पुढील उपचारासाठी हलविण्यात आले होते. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा अनिकेत होता.

दरम्यान, ३१ नोव्हेंबर रोजी मीराबाई सोनवणे यांचा मुंबईत खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असतांना मृत्यू झाला. त्यावेळी अरूण सोनवणे हे जळगावात राहत्या घरी एकटेच होते. आज सकाळी मीराबाई सोनवणे यांचा मृतदेह मुंबईहून येत असल्याने अरूण सोनवणे यांचे लहान भाऊ सुनिल सोनवणे हे घरात आवराआवर करण्यासाठी आज सोमवारी १ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता अरूण सोनवणे यांच्या घरी गेले. त्यावेळी त्यांचा घरात दरवाजा आतून बंद होता. सुनिल यांनी घरात दरवाजा तोडला असता मोठा भाऊ अरूण सोनवणे यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे आढळून आले.

पत्नी मिराबाई सोनवणे यांच्या मृत्यूची वार्ता कळल्यानंतर त्यांनी धसका घेवून राहत्या घरात गळफास घेतल्याचे सांगितले जात आहे. त्यांना खाली उरवून भाऊ सुनिल सोनवणे व इतरांनी तत्काळ जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात आणण्यात आला. वैद्यकीय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. मयताच्या पश्चात आई सरूबाई, वडील खंडू सोनवणे, तीन भाऊ, सपना आणि अर्चना दोन विवाहित मुली आणि मुलगा अनिकेत असा परिवार आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यची नोंद करण्यात आली आहे.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.