येवला-मनमाड महामार्गावर भीषण अपघात, ८ जण जखमी

0

येवला, लोकशाही न्यूज नेटवर्क

येवला-मनमाड महामार्गावर कासारखेडे शिवारात बुधवारी (दि. २७)दुपारी टाटा मॅजिक व इरटीका या दोन वाहनात सामोरेसोमोर धडक झाली. या अपघातात शहादा येथील आठ जण जखमी झाले आहे. यात एक सहा महिन्याच्या बालकाचा समावेश आहे. दोन्ही वाहनांची समोरासमोर झालेली धडक इतकी भीषण होती, की टाटा मॅजिकचा पुढील भाग पूर्णतः चक्काचूर झाला आहे. इरटीकाचे मोठे नुकसान झाले आहे. अपघाताची माहिती समजतात आजूबाजूचे ग्रामस्थ मदतीसाठी धावले.

येवला येथे तातडीने दूरध्वनी करून मदतीसाठी रुग्णवाहिका बोलविण्यात आल्या. त्याद्वारे तातडीने रुग्णांना येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे डॉक्टरांनी कमतरता असल्याने काही खासगी डॉक्टरांना या ठिकाणी बोलावून त्यांनी जखमींवर तातडीने प्राथमिक उपचार केले.

शहादा (जि. नंदुरबार) येथून शिर्डीला साईबाबांच्या दर्शनासाठी येत असताना, कासारखेडा येथे इरटीका (एमएच ४३, बीई ३७७८) आणि टाटा मॅजिक यांच्यात धडक होऊन हा अपघात झाला. यात मनोहर हिरालाल माळी (वय ३०), रोहिदास हिरालाल बोरसे (वय ३२), हरी शिवा माळी (वय २८), जयश्री मनोहर माळी (वय २८), प्रमिला हिरालाल माळी (वय ५०), रूपाली रोहिदास बोरसे (वय ३०), भार्गवी रोहिदास बोरसे (वय ८), शिव रोहिदास बोरसे व कृष्णा मनोहर माळी (दोघे ६ महिने) जखमी झाले.

शहादा येथील अपघातातील जखमींची मंत्री गिरीश महाजन यांनी भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष समीर समदडिया यांच्याकडून भ्रमणध्वनीवरून चौकशी केली व येथील ग्रामीण रुग्णालयाच्या अधीक्षक डॉ. कृपास्वामी यांना जखमींवर उपचार करण्याच्या सूचना केल्या. उपचारानंतर जखमींच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने खासगी वाहनाने ते शहाद्याकडे रवाना झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.