कँसरसंबंधी असणाऱ्या गैरसमजामुळे पित्याने केली मुलाची हत्या

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कँसरसंबंधी असणाऱ्या गैरसमजांमुळे एका पित्याने आपल्या १२ वर्षाच्या मुलाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सातारा जिल्ह्यात हा घडला आहे. २३ डिसेंबरला कोरेगाव तालुक्यातील हिवरे गावातील शेतात मुलाचा मृतदेह आढळला होता. स्थानिक लोकांनी माहिती दिल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ताब्यात घेल्यानंतर त्यांनी शवविच्छेदनासाठी पाठवत तपास सुरु केला होता.

पोलीस तपासादरम्यान काही धक्कादायक खुलासे झाले. कारण मुलाची त्याच्या जन्मदात्या बापाने हत्या केली. पण यापेक्षा धक्कादायक म्हणजे त्याने आपल्याला अशक्तपणा वाटत असल्याचे त्याने मुलाला संपवलं होत. अशक्त वाटत असल्याचे त्याला आपल्याला कॅन्सर झाला आहे असं वाटत होत. आपला मुलगाही या आजाराच्या तावडीत सापडू नये अशी भीती त्याला वाटत होती. याच भीतीतून त्याने मुलाला जीवे मारलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
आपला मृत्यू झाल्यानंतर मुलाचा सांभाळ कोण करेल याची चिंता त्याला सतावत होती.

शवविच्छेदन अहवालानंतर पोलिसांना शंका
पोलिसांनी मुलाची हत्या केल्याप्रकरणी शेतकरी पित्याला अटक केली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असता दोरीने गळा दाबून त्याची हत्या झाल्याचं स्पष्ट झालं. पोलीस अधिक्षक समीर शेख यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी एक पथक तयार केलं होतं. चौकशीदरम्यान पोलिसांनी पिताच आरोपी असल्याचे पुरावे मिळाले.

Leave A Reply

Your email address will not be published.