मोठी बातमी: प्रियंका गांधींच्या अडचणीत वाढ, मनी लाँड्रिंग..

0

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क 

आताची सर्वात मोठी बातमी आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांच्या अडचणी वाढल्या आहेत. शस्त्रास्त्रांचा व्यापार करणारा संजय भंडारी याच्याशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने (ED) दाखल केलेल्या आरोपपत्रात प्रियंका गांधी यांच्या नावाचा उल्लेख करण्यात आला आहे. तसेच  तपास यंत्रणेनं आरोपपत्रात प्रियंकाचे पती रॉबर्ट वाड्रा यांच्या नावाचाही उल्लेख केला आहे. तर आरोपपत्रानुसार प्रियंका गांधी यांना या प्रकरणात आरोपी ठरवण्यात आलेले नाही.

https://x.com/ANI/status/1740238446231421264?s=20

ईडीने हरियाणाच्या फरीदाबादमधील पाच एकर शेतजमिनी ताब्यात घेतल्या आणि त्यानंतर विकल्याचा उल्लेख करत काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांचा आरोपपत्रात समावेश केला आहे. संबंधित जमिनीचा व्यवहार 2006 मध्ये झाला होता, जिथे प्रियंका गांधी यांनी दिल्लीस्थित रिअल इस्टेट एजंट एच एल पाहवा यांच्याकडून मालमत्ता खरेदी केली होती आणि नंतर फेब्रुवारी 2010 मध्ये ती त्यांना परत विकली होती. ईडीच्या तपासाने या प्रकरणाचा संबंध फरार शस्त्र व्यापारी संजय भंडारी याच्या मोठ्या तपासाशी जोडला गेला आहे.

दरम्यान अंमलबजावणी संचालनालयाने प्रियांका यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांचे नाव मनी लाँड्रिंग प्रकरणातील आरोपपत्रात दाखल केला. यानंतर दोन दिवसांनी हा प्रकार घडला आहे. ईडीने कथित मध्यस्थ संजय भंडारी विरुद्ध मनी लाँड्रिंग प्रकरणाशी संबंधित लंडनच्या मालमत्तेचे नूतनीकरण आणि राहण्याचा आरोप केला. या प्रकरणाचा संबंध फरारी शस्त्र विक्रेता भंडारी याच्या मोठ्या तपासाशी आहे. हा तपास मनी लाँड्रिंग, परकीय चलन आणि काळ्या पैशाच्या कायद्यांचे उल्लंघन आणि अधिकृत गुप्तता कायदा यावर केंद्रित आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.