यावल हादरलं ! कुऱ्हाडीने वार करून महिलेचा खून

0

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क 

यावल पुन्हा खुनाच्या घटनेने हादरलं आहे. शनिवार दि. २८ रोजी सायंकाळी शहरात एका महिलेचा खून झाला आहे. या प्रकरणी एका महिलेसह चार संशयिताना अटक करण्यात आली असून ते पोलिस कोठडीत आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

यावल शहरातील काझीपुरा परिसरात शनिवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास नाजिया खलिल काझी (वय ३५, रा. काझीपुरा, यावल) या महिलेवर संशयित जावेद युनूस पटेल याने कुऱ्हाडीने हल्ला केल्याने महिलेचा मृत्यू झाला आहे. मागील एका घटनेत संबंधित मृत महिलेने फैजपूर येथील काही तरुणांच्या मदतीने जावेद पटेल या तरुणावर हल्ला केला होता. याच घटनेचा काटा काढण्यासाठी महिलेचा खून झाल्याची माहिती मिळाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. तर यावल ग्रामीण रूग्णालयात डॉ. पवन जैन यांनी तपासणी करून महिलेस मृत घोषित केले आहे.

दरम्यान जावेद पटेल या संशयिताने स्वतः कुऱ्हाडीसह पोलिस ठाण्यात हजर झाल्याने त्यास ताब्यात घेण्यात आले आहे. घटनास्थळी पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांनी भेट दिली आहे. श्वानपथकास पाचारण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. रात्री उशिरापर्यंत येथील पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.