मोहित कंबोज यांचा राष्ट्रवादीच्या बड्या महिला नेत्याला इशारा

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क  

भाजप नेते मोहित कंबोज (Mohit Kamboj) हे नेहमी त्यांच्या ट्विटमुळे चर्चेत असतात. मोहीत कंबोज यांनी ट्वीटच्या माध्यमातून कोणाला इशारा दिला तर नक्कीच काहीतरी खळबळजनक प्रकरण समोर येतं. असच एक सूचक ट्विट मोहित कंबोज यांनी राष्ट्रवादीच्या एका बड्या महिला नेत्यावर केलंय. म्हणून आता सर्वांचं लक्ष लागून आहे की नेमकं काय खळबळजनक बाहेर येणार ?

मागच्या काही दिवसांपूर्वी त्यांनी राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यावर कारवाई होणार असे ट्वीट केले होते. यावरून ते जोरदार चर्चेत आले होते दरम्यान त्यांनी पुन्हा राष्ट्रवादीला घेरलं आहे.  राष्ट्रवादीच्या महिला प्रदेश अध्यक्षा विद्या चव्हाण (Vidya Chavan) यांनाच थेट आव्हान देणारे ट्विट केले आहे.

विद्या चव्हाण ह्या राष्ट्रवादीच्या सक्रीय नेत्या आहेत. त्यांनी विविध मुद्यांवरून भाजपला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान मोहीत कंबोज यांनी विद्याताई जय श्रीराम या त्यांच्या वक्तव्यावरुन आता राजकीय वर्तुळात नेमके काय होणार याबाबत चर्चा रंगली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.