कर्मनिर्जरा करण्यासाठी तपश्चर्या उत्तम साधन – डॉ. पदमचंद्र मुनी

0

 

प्रवचन सारांश – 27.08.2022

 

कोणी वाईट, चांगले कर्म केले त्याचे बरे वाईट परिणाम तर भोगावेच लागतात. कळत नकळत आपण सर्वच कर्मबंध बांधत असतो. कर्मनिर्जरा करण्यासाठी तपश्चर्या करणे हा उत्तम उपाय आहे, उत्तम साधन आहे. कर्म व तपश्चर्येबाबत विवेचन करताना त्यांनी मुनी आणि धोबी यांची रंजक अशी गोष्ट सांगितली. त्यानंतर श्रीकृष्ण वासुदेव, राणी पद्मावती यांच्याबाबत अख्यायिका सांगितली. वासुदेव कृष्ण यांनी अरिष्टनेमी यांना द्वारका नगरीच्या भवितव्याबाबत विचारले. त्यावर त्यांनी असे सांगितले की, सुरा, अग्नी आणि द्वैपायन ऋषींच्या क्रोधामुळे द्वारका नगरीचा नाश होईल. १२ योजन लांब ९ योजन रुंद जणू प्रत्यक्ष स्वर्गपुरीच होय. अशा सुंदर व कृष्णाने वसविलेल्या त्या नगरीचा विनाश तीन कारणांनी होईल याविषयी चिंतन ते करू लागले. जाली, मराठी, उवयाती, पुररीससजा, वारिसन आदि भाग्यवान आहेत ज्यांनी संपत्ती, परिजन याला त्याग करून प्रभू नेमिनाथ यांच्याकडे प्रव्रजीत झाले. परंतु मी तितका भाग्यवान नाही की सर्व त्यागुन भगवान नेमिनाथ यांच्या कडून प्रव्रज्या घ्यायला असमर्थ आहे.

द्वारका नगरी नष्ट होणार, काया आणि माया राहणार नाही हे कृष्णाला समजले आणि त्यानतर त्यांनी जाहीर केले की, नगरीचे कुणी ही असो ज्यांना दीक्षा घ्यायची के दीक्षा घेऊ शकतात त्यांना पूर्ण परवानगी व सौजन्य असेल. त्यावेळी राणी प‌द्मावती जी कृष्णाची पत्नी असते ती दीक्षा घेते. कुणी त्याग करत असेल तर  त्यागाची अनुमोदना करायला हवी. याबाबत डॉ. पदमचंद्रमुनी यांनी पर्युषण पर्वाच्या चौथ्या दिवशी विशेष प्रवचनात द्वारका नगरी विनाशाचे कारण व अशा ही

परिस्थितीत जगरातील व्यक्ती व राणी पद्मावती यांची दीक्षा याबाबत सविस्तर सांगितले.

जयगच्छाधिपती 12 वे पट्ट्घर आचार्यश्री पू. पार्श्वचंद्र म.सा. आदिठाणा ७ यांच्या पवित्र सान्निध्यात जळगाव येथील स्वाध्याय भवन येथे चातुर्मास कार्यक्रम सुरू आहे. सध्या जैन धर्माचे पवित्र असे पर्युषण पर्व सुरू आहे. त्यामध्ये ‘अंतगढ़दशा सूत्र’ वाचन करण्यात येत आहे. प्रवचन आणि त्यानिमित्त अन्य धार्मिक उपक्रमामध्ये असंख्य श्रावक-श्राविका सहभागी होत असतात.

………………………..

पू. डॉ. पदमचंद्रजी मुनी यांचे सुशिष्य पू. जयधुरंधर मुनी यांचे जळगावात प्रवचन सुरु असून किशोर कुलकर्णी यांनी शब्दांकन केलेली त्यांची ‘मेरी भावना’ ही प्रवचन मालिका दै. लोकशाही ~ लोकलाईव्हवर प्रसिद्ध करीत आहोत. रोजचं नवीन प्रवचन जरूर वाचा फक्त लोकशाही वर…

 

Leave A Reply

Your email address will not be published.