नगरदेवळा येथुन  मोटरसायकलची चोरी :-अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल

0

पाचोरा : लोकशाही न्युज नेटवर्क

तालुक्यातील नगरदेवळा येथुन अज्ञात चोरट्याने लबाडीच्या इराद्याने ३० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल चोरीस नेल्याची घटना घडली आहे‌. घटनेप्रकरणी पाचोरा पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिस स्टेशनमध्ये दाखल गुन्ह्यानुसार पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा येथील रहिवाशी नरेंद्र दत्तुसिंग राऊळ यांच्या घरासमोरुन ३० हजार रुपये किंमतीची मोटरसायकल (क्रं. एम. एच. डी. एच. ३४२०) ही २२ मे रोजी च्या सायंकाळी ७:३० ते २३ मे रोजी च्या सकाळी ६ वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्याने चोरुन नेली आहे. नरेंद्र राऊळ यांच्या फिर्यादीवरून पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला असुन या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस काॅन्स्टेबल मनोहर पाटील हे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.