डोंबिवली ब्लास्ट : १६ जणांचा मृत्यू, १० जण बेपत्ता

0

डोंबिवली : लोकशाही न्युज नेटवर्क –
अमुदान केमिकल कंपनीत गुरुवारी स्फोट झाल्यापासून बेपत्ता असलेल्या राकेश ब्रम्हदिन राजपूत (वय ४०) या कामगाराचा मृतदेह शनिवारी सुरू असलेल्या बचाव कार्याच्यावेळी मिळून आला. राकेश राजपूत अमुदान केमिकल कंपनी लगतच्या सप्तवर्ण कंपनीत नोकरीला होता. दरम्यान या स्फोटातील एकूण मृतांचा आकडा १६वर गेला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.या घटनेत आत्तापर्यंत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. घटनास्थळावर मानवी अवशेष सापडत आहेत. काही अवशेष ढिगाऱ्यांखाली तर काही आसपासच्या कंपन्यांमध्ये आढळून आले. यामुळे रविवारी दिवसभर शोधकार्य सुरु राहण्याची शक्यता आहे.१० जण बेपत्ताअमुदान कंपनी स्फोट प्रकरणात अमुदान कंपनीसह सप्तवर्ण, कॉसमॉस कंपनीतील एकूण १० जण बेपत्ता आहेत. या बेपत्ता कामगारांचे नातेवाईक मानपाडा पोलीस ठाणे, शास्त्रीनगर रुग्णालय, कंपनी परिसरात जाऊन शोध घेण्याची मागणी करत आहेत. बचाव कार्यात सापडलेले सहा मृतदेह ओळखण्याच्या पलीकडे आहेत. त्यामध्ये या कामगारांचा समावेश असण्याची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. मृतदेह आणि त्यांच्या नातेवाईकांच्या फोरेन्सिक, डीएनए चाचण्या केल्यातर जळीत मृतदेह कोणत्या कुटुंबातील आहेत ते स्पष्ट होणार आहे. त्या प्रक्रिया आता सुरू करण्यात आल्या आहेत, असे एका तपास अधिकाऱ्याने सांगितले. आपल्या कुटुंबातील सदस्य बेपत्ता असल्याने कुटुंबीयांमध्ये अस्वस्थता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.