जयहिंद व्यायाम शाळेतर्फे ठेक्याची कुस्ती स्पर्धा संपन्न

0

अमळनेर : लोकशाही न्युज नेटवर्क

येथील शिरूड नाका भागातील जयहिंद व्यायाम शाळेतर्फे उन्हाळ्याच्या सुट्टीत विद्यार्थ्यांसाठी १८ वर्षाखालील ठेक्याच्या कुस्ती स्पर्धा संपन्न झाल्या. भर उन्हाळ्यात देखील विद्यार्थी पैलवानांनी मातीत घाम गाळून आपल्या डावपेच व कसरतीचे गुणांचे प्रदर्शन केले.
मोबाईल मुळे विद्यार्थी माती ,मैदानपासून दूर जात आहेत. म्हणून उन्हाळी सुटीत सुट्टीत विद्यार्थ्यांनी क्रीडा क्षेत्राकडे वळावे यासाठी माजी नगरसेवक प्रताप शिंपी आणि पवन शिंपी यांनी ठेक्याच्या कुस्ती स्पर्धा आयोजित केल्या होत्या.
जळगाव ,धुळे ,एरंडोल , कासोदा ,मांडळ ,भुसावळ, कापडणे ,धरणगाव ,कजगाव ,चाळीसगाव , पाचोरा ,जामनेर येथील पैलवानांनी सहभाग घेतला होता. प्रमुख अतिथी म्हणून बाजार समिती सभापती अशोक पाटील , अमेय मुंदडा ,डॉ अनिल शिंदे ,महेंद्र बोरसे ,शेखा हाजी सलीम फत्तु,कुशल विसपुते ,प्रल्हाद पाटील,डॉ. चोटे , बाळासाहेब पाटील ,छोटू जैन , कैलास पाटील , विजय पाटील ,प्रवीण पाटील,माजी नगरसेवक दीपक पाटील,भोमा धनगर हजर होते. मारुती व आखाड्याचे पूजन करून स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आले भूषण भाऊ भदाणे यांनी 21 हजार रुपये रोख बक्षीस दिले आणि . स्व दिनेश संकलेचा यांच्या स्मरणार्थ २१ हजार रुपये व ट्रॉफी असे बक्षीस देण्यात आले होते. विजेते व उपविजेत्याना प्रमुख अतिथींच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. पंच म्हणून पैलवान रावसाहेब पाटील , बबलू पाटील यांनी काम पाहिले. सूत्रसंचालन दीपक चौधरी ,अरुण पाटील यांनी केले. स्पर्धा यशस्वी करण्यासाठी प्रताप शिंपी ,जीवन पवार ,सुनील शरद प्रमोद भाऊ सोनार शुबम सोनार रघुनाथ छोटू गोपाल चौधरी पाटील पाटील,बबलू पाटील , पिंटू शिंपी ,मधू चौधरी , अमोल चौधरी , पवन चौधरी , सागर शिंपी , बंटी महाजन ,विकी पाटील ,निशांत बडगुजर ,बंडू सोनार , संजय मराठे ,सूरज शिंपी , वैभव पाटील ,भोमेश सोनार सागर बडगुजर अर्जुन भाऊ चौधरी ,हर्षल पाटील , अजय पाटील , गोविंदा पाटील विजय पाटील विजय बडगुजर यांचे सहकार्य लाभले.बाल पैलवानानी विविध डावपेच आणि कौशल्य पणाला लावल्याने स्पर्धा अतिशय प्रेक्षणीय ठरल्या. उन्हाळ्याच्या सुट्टीत मुलांना क्रीडा क्षेत्राकडे ,मैदानकडे वळवण्यासाठी जयहिंद शाळेने राबववलेल्या उपक्रमाचे कौतुक होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.