जीवे मारण्याच्या प्रयत्नातील आरोपीस न्यायालयाने सुनावली नऊ वर्षाची शिक्षा

0

मलकापुर : लोकशाही न्युज नेटवर्क

येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश पि.आर. कदम यांनी पो.स्टे नांदुरा येथील गुन्हा क्र 470/16 कलम 307 भादवी मधील आरोपी गोपाल गणपत राखोंडे रा. नांदुरा यास कलम 307 अन्वे गुन्हा सिद्ध झाल्याने दि.24 मे 24 रोजी दोषी ठरविले आहे.
याबाबतची हकीकत अशी की गोपाळ राखोंडे याचा सुभाष गणपत राखोंडे याचे सोबत वडिलोपार्जित जमिनीवरून वाद होता, त्या कारणावरून आरोपी गोपाल राखोंडे याने सुभाष राखोंडे याचे पोटात चाकू मारून जखमी केले होते, सुभाष राखोंडे याने दिलेल्या रिपोर्टवरून गोपाल राखोंडे याचे विरुद्ध कलम 307 नांदुरा पो.स्टे येथे दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हे तपास तत्कालीन पोलीस निरीक्षक सचिन शिंदे यांनी केला सदर प्रकरणाचा तपास पूर्ण होऊन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले, आरोपी विरुद्ध न्यायालयात खटला चालविण्यात आला सरकार पक्षातर्फे एकूण 14 -15 साक्षीदार तपासण्यात आले. त्यापैकी सुभाष राखोंडे तसेच डॉ. व इतर साक्षीदार यांची साक्ष महत्त्वाची ठरली, त्यावरून आरोपी विरुद्ध गुन्हा सिद्ध झाल्याने न्यायालयाने आरोपी गोपाल राखोंडे यास नऊ वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा व पंचवीस हजार रुपये दंड दंड न भरल्यास तीन महिने साधी कैद, दंडाची रक्कम भरल्यानंतर सदर रक्कम सुभाष राखोंडे यांना नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावी, असा आदेश वि.न्यालयाने दि.24 मे 24 रोजी पारित केलेला आहे, सरकार पक्षातर्फे ॲड व्ही. एम. बापट सह सरकारी अभियोक्ता यांनी युक्तिवाद केला, कोर्ट पैरवी कडू बोरसे यांनी काम पाहिले.

Leave A Reply

Your email address will not be published.