धानोऱ्यात चढ्या दराने बियाणे विक्री : पथकाची कारवाई

0

धानोरा l लोकशाही न्युज नेटवर्क –

चोपडा तालुक्यातील धानोरा येथे दि २५ मे २०२४ रोजी दूरध्वनी वरून प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कापूस बियाणे चढ्या दराने विक्री होणे बाबत सापळा रचण्यात आला. तक्रारदार निवृत्ती प्रल्हाद खैरनार राहणार देवगाव धानोरा येथील गावातील किसान कृषी सेवा केंद्र येथे राशी 659 कापूस संकरित बी प्लस वाण
जादा दराने विक्री होत असल्याबाबत तक्रार केली. तालुकास्तरीय पथकाने तक्रारीचे दखल घेऊन तात्काळ तेथे गेले सदर कारवाई संध्याकाळी सहा वाजता करण्यात आली यावेळी शेतकरी म्हणून निवृत्ती करणार हे स्वतः 1200 रुपये दिले व वाणाची खरेदी केली
तरी खरेदी बाबत सापडा रचण्यात आला संबंधित शेतकरी दुकानात जाऊन एक बॅग खरेदी केली परंतु सदर बियाणे राशी 659 ची खरेदी बिल संबंधित दुकानदाराने दिले नसल्याबाबत शेतकऱ्याचे म्हणणे आहे प्रत्यक्ष दुकानाची तात्काळ तपासणी केली असता बाराशे पैकी हजार रुपये सापडले तर 200 ची नोट आढळून आली नाही या वेळेला पंचायत समितीचे कृषी अधिकारी दीपक साळुंखे कृषी विस्ताराधिकारी किरण पाटील किरण देशमुख तक्रारदार आधी उपस्थित होते सदर कार्यवाही ही गावात प्रथमच झाले असल्याने कृषी केंद्र धारकांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे

Leave A Reply

Your email address will not be published.