Close Menu
लोकशाहीलोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • जिल्हा बँक निवडणुकीत महायुतीचे जागावाटप गिरीश महाजनांकडे!
    • लाचखोर अभियंता शिसोदे यांच्याकडे सव्वा पाच कोटींचे घबाड
    • नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी
    • राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड
    • अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?
    • अमिताभ बच्चनच्या ‘जलसा’वर दहशतीचे सावट!
    • दानाचे महत्व सांगणारी ‘धनत्रयोदशी’!
    • सात अटी मान्य करा, अन्यथा होर्मुजची खाडी खुली नाही!
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाहीलोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • स्किन केअर
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाहीलोकशाही
    Home»महाराष्ट्र»शंभर कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त : नाशिकमध्ये आयकर विभागाची कारवाई
    महाराष्ट्र

    शंभर कोटींपेक्षा अधिक मालमत्ता जप्त : नाशिकमध्ये आयकर विभागाची कारवाई

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveMay 26, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    नाशिक: लोकशाही न न्युज नेटवर्क –

    गेल्या काही दिवसांपासून आयकर विभाग चांगलाच सक्रिय झाला आहे. या विभागाने नुकतेच नांदेडमध्ये मोठी छापेमारी केली होती. या छापेमारीत कोट्यवधींची रोकड जप्त करण्यात आली होती. त्यानंतर आता नाशिकमध्येही अशाच प्रकारची कारवाई करण्यात आली आहे. येथे एका सराफा व्यावसायिकाशी संबंधित मालमत्तांवर छापेमारी करून आयकर विभागाने तब्बल २६ कोटी रुपयांची रोकड आणि ९० कोटींच्या बेहिशोबी मालमत्तेचे दस्तावेज जप्त करण्यात आले आहेत. आयकर विभागाच्या या कारवाईमुळेही कारवाई करताना नाशिक, नागपूर आणि जळगावचे अधिकारी एकत्र आले होते. त्यांनी एकूण २६ कोटींची रोकड जप्त केली आहे. ज्यावेळी आयकर विभागाच्या पथकाने छापेमारी केली त्यावेळी एका खोलीत पाचशे रुपयांच्या चलनी नोटांचा खच सापडला. घबाड इतका मोठा होता की जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी या अधिकाऱ्यांना तब्बल १४ तास लागले आहेत. सध्या नाशिकमध्ये एकच खळबळ उडाली आहे.
    जप्त केलेली ही रक्कम मोजण्यासाठी आयकर विभागाला एकूण सात कार बोलवाव्या लागल्या. सलग ३० तास ही कारवाई चालू होती. सदर छापेमारीनंतर आता पुढे काय कारवाई होणार याकडे अनेकांचे लक्ष लागले आहे.नाशिक शहरात खळबळ

    नाशिक शहरात एका सराफा व्यापाऱ्याकडे एवढ्या मोठ्या प्रमाणात बेहिशोबी मालमत्ता सापडल्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. या कारवाईमुळे व्यापाऱ्यांमध्ये सध्या तणावाचे वातावरण आहे. आगामी काळात आयकर विभाग कारवाईचा भडका कोणावर उचलणार याची दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे.

    https://lokshahilive.com/wp-content/uploads/2026/09/WhatsApp-Video-2026-09-16-at-10.29.50-PM.mp4

    #nashik Nashik
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    नवी मुंबईत गोळीबार : दोन तरुणी गंभीर जखमी

    November 6, 2026

    राज्यातील शेतकऱ्यांची दुष्काळ निधी मिळवताना परवड

    November 6, 2026

    अजितदादांच्या पक्षात होणार उलथापालथ?

    November 6, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif