धक्कादायक; गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 20 जण जिवंत जळाले…

0

 

राजकोट, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

गुजरातमधील राजकोटमधील कलावद रोडवरील टीआरपी गेमिंग झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 20 लोक जिवंत जाळले गेले. मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. आतापर्यंत एकूण 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. आगीत जळालेल्या मृतदेहांची ओळख पटवणे कठीण झाले आहे. आगीत किती लोकांचा मृत्यू झाला हे शोधण्यासाठी बचाव पथके अजूनही शोध घेत आहेत. मृतांमध्ये बहुतांश विद्यार्थी असल्याचे सांगण्यात येत आहे. आगीच्या उंच ज्वाळा काही किलोमीटर दूर दिसत होत्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.

बचावकार्य अजूनही सुरू आहे
राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, टीआरपी गेमिंग झोनमध्ये दुपारी आग लागली. बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आली आहे. आम्ही जास्तीत जास्त मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. आतापर्यंत सुमारे 20 मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. गेमिंग झोन युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीच्या मालकीचा आहे.

सध्या शहरातील सर्व गेम झोन बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मुख्यमंत्री भूपेंद्रभाई पटेल यांनी राजकोटच्या जबाबदार अधिकाऱ्यांकडून फोनवरून चर्चा करून माहिती घेतली. चौकशीसाठी विशेष समिती स्थापन करण्यात आली आहे. अपघातानंतर गेम झोन व्यवस्थापक फरार झाला आहे. गेम झोनचा मालक युवराज जडेजा याला राजकोट पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
तपासात मोठा निष्काळजीपणा समोर आला
या गेम झोनच्या एका भागात नूतनीकरणाचे काम सुरू असताना दोन दिवसांपूर्वी हा गेम झोन शॉर्टसर्किटमुळे बंद करण्यात आला होता आणि एक दिवसानंतर तो आज अचानकपणे सुरू करण्यात आला असल्याचे तपासात समोर आले आहे.

आग विझवण्यात अडचण
यापूर्वी मुख्य अग्निशमन अधिकारी आय.व्ही. असे खेर यांनी सांगितले कि, आम्ही आग विझवण्याचा प्रयत्न करत आहोत. संरचनेची पडझड आणि जोराचा वारा यामुळे आग विझवण्यात अडचणी येत आहेत. आग विझवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी मदतकार्याचे आदेश दिले आहेत
गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी ट्विट केले की, राजकोटमधील गेमिंग झोनमध्ये लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना महापालिका आणि प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याच्या व्यवस्थेला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.

अनेक लोक अडकण्याची भीती
गुजरातमधील राजकोट शहरातील गेमिंग झोनमध्ये शनिवारी संध्याकाळी भीषण आग लागली आणि जीवितहानी होण्याची भीती आहे, असे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.