१० वीच्या निकालाची तारीख ठरली; वाचा कुठे आणि कसा बघता येईल निकाल…

0

 

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क;

 

१० वीच्या निकालाची विद्यार्थ्यांपासून ते पालकांपर्यंत सर्वच वात पाहत आहे. सर्वांनाच आपल्या प्रगतीची प्रचीती अनुभवायची आहे. कारण दहावीचा निकाल हा शैक्षणिक जीवनाचा प्रथम महत्वाचा टप्पा मानला जातो. तर गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेल्या महाराष्ट्र राज्य बोर्डाचा दहावीचा रिझल्ट हा 27 मी रोजी लागणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाची तारीख जाहीर केली आहे. 27 मे 2024 रोजी निकाल ऑनलाईन पद्धतीने पाहता येणार आहे. आईचे नाव टाकून महाराष्ट्र 10 वीचा निकाल पाहता येणार.

निकाल पाहण्यासाठी खालील स्टेप्स फॉलो करा.

www.mahresult.nic.in  ला भेट द्या.
• SSC Examination Result 2024 वर क्लिक करा.
• रोल नंबर आणि आईचे नाव टाका.
• त्यानंतर तुम्हाला SSC Result तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
एसएमएसवर चेक करा 10 वीचा निकाल
• एसएमएस (SMS) वर निकाल पाहण्यासाठी सर्वप्रथम फोनमधील मेसेज बॉक्स ओपन करा.
• त्यानंतर MHSSC (स्पेस द्या) सीट नंबर किंवा रोल नंबर टाईप करा.
• मग हा टाईप केलेला मेसेज 57766 या क्रमांकावर सेंड करा.
• यानंतर तुम्हाला मेसेजवर तुमचा निकाल पाहता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.