Sunday, January 29, 2023

मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला खिंडार; शेकडो कार्यकर्ते शिंदे गटात सामील

- Advertisement -

मुक्ताईनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) मुक्ताईनगर (Muktainagar) दौऱ्यावर काल (शनिवार) होते. एकनाथ खडसे (Eknathrao Khadse) यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसची (NCP) बैठक पार पडली. मात्र  या बैठकीनंतर नेते परत फिरवताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटाची वाट धरली. शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांच्या नेतृत्वावर विश्वास सारोळा, रिगाव येथील शेकडो राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात (Shinde Group) प्रवेश केला.

राष्ट्रवादीचे नेते तथा आमदार एकनाथराव खडसे यांचा बालेकिल्ला असलेल्या मुक्ताईनगरमध्ये राष्ट्रवादीला मोठं खिंडार पडलं आहे. शिंदे गटाने शिवसेनेमध्ये उभी फूट पडली होती. शिवसेनेपाठोपाठ आता शिंदे गट राष्ट्रवादीला खिंडार पडत आहे. शनिवारी जयंत पाटील (Jayant Patil) हे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. दरम्यान यावेळी जयंत पाटलांनी मुक्ताईनगरला देखील भेट दिली. मात्र जयंत पाटलांच्या भेटीनंतर काही वेळातच शिंदे गटाकडून राष्ट्रवादीला मोठा झटका बसला.

- Advertisement -

शिंदे गटाचे मुक्ताईनगरचे अपक्ष आमदार चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत मुक्ताईनगर तालुक्यातील सारोळा आणि रिगाव येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे.

 

spot_imgspot_img

हे वाचायलाच हवे