चोरट्याने दागिने पॉलिशच्या बहाण्याने सोन्याची पोत लांबविली…

0

 

यावल, लोकशाही न्यूज नेटवर्क:

दागिने चमकवून देतो असे सांगून अज्ञात भामट्याने ५० हजार रुपये किमतीची सोन्याची पोत लांबविण्याची घटना यावल तालुक्यातील वढोदा येथे घडली आहे. या संदर्भात यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत वृत्त असे की, सुरेश नामदेव चौधरी (७०) रा. वढोदा ता. यावल हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. मंगळवार ११ एप्रिल रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास सुरेश चौधरी हे घरी असताना एक अनोळखी व्यक्ती त्यांच्या घरासमोर आला. मी जुने दागिने पॉलिश करून देतो” म्हणत त्यावर त्याने घरातील जुनी वस्तू आणण्यास सांगितले. सुरेश चौधरी यांनी घरातील पितळी तांब्या त्याने लिक्विडने घासून चमकवून दाखविला. या कृत्याने विश्वास संपादित करत त्याने सोन्याचे दागिने आणण्याचे सांगितले त्यानुसार सुरेश चौधरी यांनी पत्नी उज्वला चौधरी यांच्या गळ्यातील अडीच तोळ्याची सोन्याची चैन काढून त्याच्या हातात दिली. त्याने डब्यात सोन्याची चैन टाकून हळद लावली नंतर डबा गॅसवर ठेवून तो गरम केला त्यानंतर त्याने “पाच मिनिटांनी डबा थंड झाल्यावर चेन काढून घ्या” असे सांगित तो निघून गेला, दरम्यान पाच मिनिटानंतर डबा उघडून पाहिला असता त्यात सोन्याची चैन दिसून आली नाही. या नंतर आपली फसवणूक झाल्याची लक्षात आल्यानंतर त्यांनी तातडीने यावल पोलीस ठाणे गाठत तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञाता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.